जन्मपत्रिकेत ग्रहांची महादशा किंवा अंतर्दशा चालू असताना, किंवा शनी, राहू, केतू यांसारख्या ग्रहांचे दोष जाणवत असताना वैदिक परंपरेत नवग्रह शांतीचा उपाय सांगितला आहे. कामातील अडथळे दूर होऊन भाग्यवृद्धी व्हावी, हा या विधीचा मुख्य उद्देश आहे.
नवग्रह शांती विधी
एका दिवसात होणाऱ्या नवग्रह शांती विधीत नऊ ग्रहांसाठी नऊ स्वतंत्र ताम्हणे, नऊ रंगांची वस्त्रे, नऊ प्रकारच्या समिधा, नवधान्य आणि प्रत्येक ग्रहासाठी ठराविक नैवेद्य (उदा. शनीसाठी काळे उडीद) वापरले जातात.
संख्यात्मक जप म्हणजे काय?
ठराविक संख्येने (उदा. ७२,००० किंवा १,२५,०००) मंत्रांचा जप करून त्याच्या दशांश (दहावा भाग) आहुतींचे हवन करणे म्हणजे संख्यात्मक जप अनुष्ठान. हा जप अनेक पुरोहित मिळून ठराविक दिवसांत पूर्ण करतात.
- नवग्रह पीडा निवारण जप: ४ ते ५ पुरोहितांद्वारे ७२,००० वैदिक मंत्रांचा जप आणि सांगता हवन.
- महामृत्युंजय मंत्र जप: ५ वेदमूर्ती आचार्यांद्वारे ११ दिवसांत १,२५,००० मंत्रजप — दीर्घायुष्यासाठी.
- गायत्री पुरश्चरण: २४,००० किंवा १,२५,००० गायत्री मंत्रजप.
- दुर्गा सप्तशती पाठ: चंडी पाठ आणि दशांश हवन.
नक्षत्र शांती
जन्म नक्षत्राशी संबंधित दोष असल्यास (उदा. मूळ नक्षत्र) २७ विशिष्ट वनस्पती आणि होम साहित्याने नक्षत्र शांती केली जाते. लहान मुलांसाठी बालारिष्ट व गंडमूल शांती हा विधी केला जातो.