पूजा निवडा, दक्षिणा पर्याय पहा आणि गुरुजींची उपलब्ध तारीख व वेळ निवडून ऑनलाइन बुकिंग करा.
घरगुती पूजांसाठी किमान १५ दिवस आणि काशी महायज्ञांसाठी किमान १५ दिवस आधी बुकिंग आवश्यक.
सामान्य चौकशी
पूजा बुकिंग व साहित्य विक्री नियमावली
Booking Rules — बुकिंग करण्यापूर्वी कृपया सर्व नियम काळजीपूर्वक वाचा.
आगाऊ बुकिंग: काशी (वाराणसी) येथील पूजांसह सर्व पूजा व अनुष्ठानांसाठी किमान १५ दिवस आधी बुकिंग करणे अनिवार्य आहे. काशी येथे ऐनवेळी आलेल्या यजमानांचे बुकिंग स्वीकारले जाणार नाही.
पेमेंट व प्रवास खर्च: बुकिंग निश्चित करण्यासाठी एकूण रकमेच्या ५०% आगाऊ रक्कम ऑनलाइन (UPI, कार्ड, नेटबँकिंग) भरावी; उर्वरित रक्कम पूजेच्या दिवशी, पूजा सुरू होण्यापूर्वी द्यावी. गुरुजींच्या ठिकाणापासून २०० किमीपर्यंत प्रवास खर्च नाही; त्यापुढील अंतरासाठी ₹३० प्रति किमी प्रवास खर्च एकूण रकमेत जोडला जातो.
केवळ पूजा सेवा व अधिकृत साहित्य: ही वेबसाईट केवळ शास्त्रोक्त पूजा विधी, पुरोहित (गुरुजी) यांचे मानधन आणि अचूक, शुद्ध पूजा साहित्याची विक्री या सेवांसाठीच बुकिंग व ऑर्डर्स स्वीकारते. यामध्ये देवस्थानचे व्ही.आय.पी. दर्शन किंवा दर्शन पास सुविधेचा समावेश नाही.
पूजा साहित्य विक्री आणि डिलिव्हरी: आमच्याकडे सर्व प्रकारच्या पूजांचे शुद्ध, शास्त्रोक्त आणि प्रमाणित साहित्याची स्वतंत्र किट (Samagri Kit) उपलब्ध आहे. विधीसाठी लागणारे साहित्य तुम्ही थेट आमच्याकडून घरपोच ऑर्डर करू शकता.
ओळखपत्र आवश्यक: धार्मिक स्थळांच्या स्थानिक सुरक्षा नियमांनुसार, पूजा करणाऱ्या मुख्य यजमानाचे आधार कार्ड देणे बंधनकारक राहील.
इको-फ्रेंडली पूजा: नदी किंवा तीर्थक्षेत्रांचे प्रदूषण रोखण्यासाठी पूजेमध्ये कोणत्याही रासायनिक वस्तू किंवा प्लास्टिकचा वापर केला जाणार नाही. केवळ नैसर्गिक साहित्याचा वापर केला जाईल.
कॅन्सलेशन आणि तारीख बदलण्याचा नियम
यजमानांकडून बदल असल्यासबुक केलेली कोणतीही पूजा कॅन्सल (रद्द) करून भरलेल्या रकमेचा परतावा (Refund) दिला जाणार नाही. मात्र, यजमानाला पूजेची तारीख आणि वेळ बदलून (Date & Time Reschedule) घेण्याचा पर्याय दिला जाईल.
आमच्याकडून रद्द झाल्यासजर काही अपरिहार्य कारणामुळे आमच्याकडून पूजा विधी रद्द करावा लागला, तर बुकिंग करणाऱ्या यजमानाला त्यांनी भरलेली पूर्ण रक्कम (100% Full Refund) परत पाठवली जाईल.
पूजा विधी करताना यजमानाने पाळावयाचे शास्त्रोक्त नियम
सात्त्विक आहार व आचरण: पूजेच्या आदल्या दिवशी आणि पूजेच्या दिवशी पूर्णपणे सात्त्विक आहार व शुद्ध आचरण ठेवावे.
उपवास आणि शुचिता: शक्य असल्यास पूजेची मुख्य मांडणी होईपर्यंत यजमानाने उपवास पाळावा आणि पवित्र पारंपरिक वस्त्र परिधान करावे.
मानसिक शुद्धता व एकाग्रता: पूजेला बसताना मनात कोणताही राग किंवा नकारात्मक विचार न ठेवता शांत चित्ताने मंत्रोच्चार ऐकावेत.
सुवासिनी व बालकांचा आदर: पूजेच्या दिवशी घरात आलेल्या सुवासिनी स्त्रिया आणि लहान मुले (बटुक) यांना आदरपूर्वक नैवेद्य द्यावा.
उजव्या हाताचा वापर: पूजेमध्ये देवाला गंध, अक्षता, फुले वाहणे किंवा पाणी सोडणे या सर्व मुख्य क्रिया नेहमी उजव्या हातानेच कराव्यात.
अंतिम अस्वीकरण (Standard Disclaimer): ही वेबसाईट केवळ हिंदू धर्मातील शास्त्राधारित परंपरा, पूजा विधी, त्यासंबंधीची माहिती आणि शुद्ध पूजा साहित्याची व्यावसायिक विक्री या सेवा पुरवते. ही वेबसाईट कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही.