हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर एक संस्कार सांगितला आहे. जन्मापूर्वीपासून ते मृत्यूनंतरपर्यंत केले जाणारे हे सोळा संस्कार (षोडश संस्कार) व्यक्तीचे शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करून तिला जीवनाच्या पुढील जबाबदारीसाठी तयार करतात.
जन्मापूर्वीचे संस्कार
- गर्भाधान: उत्तम, सुजाण आणि सात्त्विक संतानाच्या प्राप्तीसाठी विवाहानंतर केला जाणारा पहिला गृह्य संस्कार.
- पुंसवन: तिसऱ्या महिन्यात — गर्भाच्या उत्तम शारीरिक व मानसिक विकासासाठी आणि गर्भ संरक्षणासाठी.
- सीमन्तोन्नयन (डोहाळे जेवण): ४ थ्या, ६ व्या किंवा ८ व्या महिन्यात — गर्भिणीला आनंदी ठेवण्यासाठी आणि गर्भाच्या बुद्धी विकासासाठी.
बालपणातील संस्कार
- जातकर्म: नवजात बालकाच्या जन्मानंतर त्याची बुद्धी, आयुष्य आणि बल वृद्धीसाठी.
- नामकरण (बारसे): बालकाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक ओळखीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने नाव देणे.
- निष्क्रमण: ४ थ्या महिन्यात बालकाला पहिल्यांदा घराबाहेर नेऊन सूर्य आणि चंद्र देवाचे दर्शन घडवणे.
- अन्नप्राशन: ६ व्या महिन्यात बालकाला आईच्या दुधाव्यतिरिक्त पहिल्यांदा घन (गोड) अन्न भरवणे.
- चुडाकर्म (जावळ काढणे): १ ल्या किंवा ३ ऱ्या वर्षी जन्माचे केस काढून आरोग्य, तेज आणि दीर्घायुष्यासाठी.
- कर्णवेध: बालकाचे कान टोचण्याचा पारंपरिक संस्कार.
विद्याभ्यासाचे संस्कार
- उपनयन (मुंज): बालकाला गायत्री मंत्राची दीक्षा देऊन विद्यार्जनाचा आणि आध्यात्मिक अधिकाराचा आरंभ.
- वेदारंभ: उपनयनानंतर गुरुगृही वेद आणि उपनिषदांच्या अभ्यासाला सुरुवात.
- केशान्त / गोदान: ब्रह्मचर्य आश्रमात पहिल्यांदा दाढी-मिशीचे केस काढून गुरुचरणी गोदान (किंवा त्याचे मूल्य) अर्पण करणे.
- समावर्तन (सोडमुंज): शिक्षण पूर्ण करून ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थाश्रमाकडे परतण्याचा (पदवीदान) विधी.
गृहस्थ आणि उत्तर आयुष्यातील संस्कार
- विवाह: दोन जीवांचे आणि कुटुंबांचे मिलन करून धर्मानुसार गृहस्थाश्रमाची कर्तव्ये पूर्ण करणे.
- आवसथ्याधान / वानप्रस्थ: गृहस्थाश्रमाची कर्तव्ये संपवून अग्नीला साक्षी ठेवून आध्यात्मिक आणि ईश्वरचिंतनाकडे वळणे.
- अन्त्येष्टी: मृत्यूनंतर आत्म्याच्या सद्गतीसाठी आणि पंचमहाभूतात विलीन होण्यासाठी केला जाणारा अंतिम संस्कार.
सोळा संस्कार — दक्षिणा एका नजरेत
प्रत्येक संस्काराच्या पानावर त्याचे संपूर्ण साहित्य — भांडी, साहित्य, प्रसाद आणि निसर्गोपचार — तपशीलवार दिले आहे. संस्काराच्या नावावर क्लिक करून ते पाहता येईल.